dr.satish best web design developer for mac

अर्जुनवाडी ग्रामपंचायत :

कोल्हापूर जिल्ह्यापासून  ९०  कि.मी. अंतरावर  अर्जुनवाडी  हे  गाव आहे. गडहिंग्लज  पासून २५ कि.मी.अंतरावर  अर्जुनवाडी गाव आहे. सृष्टीने हिरवीगार शाल पांघरल्याप्रमाणे दाट हिरवळ झाडी, तांबडी माती, तसेच बोलीभाषा कोकणी असलेलं आमचं गाव. आमच्या गावातील ग्रामपंचायतिची स्थापना 1958 साली झाली आहे. गावाला टिक्केवाडी, नेसरी, तळेवाडी ह्या सलग्न गावांनी वेढले आहे. ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण करून गावाच्या सभोवताली वृक्षांची लागवड केली गेली आहे.   

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

अर्जुनवाडी ग्रामपंचायत ही 1958 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 376 असून गावाची लोकसंख्या 1800 इतकी असून ती 3 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे. गावाला तंटामुक्त पुरस्काराने व हागणदारीमुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम, ग्राम स्वच्छता मोहीम, कापडी पिशवी वाटप असे विविध उपक्रम राबवले जातात. 

सरपंच
श्री. मनोहर रामू पाटील

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. सुधा शंकर पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. संजय नामदेव पाटील

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Arjunwadi Grampanchayat
A/p Arjunwadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :7507034315

Office :